नाशिक - कोरोनामुळे मृत्यू झालेले यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी आता ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. (Coronavirus News Highlights) नाशिकमध्ये आता पर्यत (3070) लाभार्थींचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 1765 अर्ज त्रुटीमुळे प्रलंबीत राहीले आहेत. (Medical Certificate of Cause of Death ) अशात पूर्ण माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता न करता अर्ज भरले जात असल्याने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता झाली आहे. त्यामुळे अर्ज भरताना काळजी घेणे गरजेचे आहे अस आवाहन सबंधितांनी केले आहे.
यंत्रणेलाच माहितीचा अभाव असल्याने सर्वसामान्यांचे अपूर्ण अर्ज भरले जात आहेत
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाकडून 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याने, त्यासाठी अर्ज दाखल करणारी एक स्वतंत्र यंत्रना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अर्ज भरण्यात अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे अनेकांना अर्ज दाखल करता आले नाहीत. (Government Assistance To The Heirs Of Those Who Died Of Corona) स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि जिल्हा आपत्ती विभागात मध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे पीडितांना अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असल्याचे समोर येत आहे. यात यंत्रणेलाच माहितीचा अभाव असल्याने सर्वसामान्यांचे अपूर्ण अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहाण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.
अर्ज भरताना अशी घ्या काळजी
ज्या लाभार्थ्यांला अर्ज दाखल करायचा आहे त्याने संबंधींचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा पुरावा जोडणे अपेक्षित आहे. यासाठी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र हेही जोडावे लागणार आहे. (Government Assistance Family Of a Person Who Died of Corona