नाशिक -आज श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार ( Shravani Somvar ) हिंदू धर्मात आजच्या दिवसात विशेष महत्व सांगितले आहे. आजच्या या पवित्र दिवशी अनेक योग जुळून येत आहे, त्यापैकी आज आईद्रयोग आणि पुत्रदा एकादशी, साक्षात नारायण आणि साक्षात शिव हरिहर असा योग आजच्या दिवशी जुळून येत आहे. या योगाचा सर्वांनी आपल्या जीवनामध्ये लाभ घेतला पाहिजे, शंकराची उपासना व्रत, जप, अनुष्ठान आणि रुद्राभिषेक असे षोडोपचारपूजन आणि राजोपचार पूजन संपन्न केले पाहिजे. त्याचबरोबर आजची शिवमुठ ही तिळाची आहे. त्यामुळे महादेवाच्या पिंडी वरती ओम पंचवक्त्राय नमः या मंत्राचा जप करून तीळ व्हावे आणि दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आपल्याला प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करावी. तसेच आज नारायणाची पण उपासना करावी असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे ( Mahant Aniket Deshpande ) यांनी म्हटले आहे.
पहीला श्रावण साेमवारी अशी पार पडली पूजा -श्रावण महिन्यातील पहीला श्रावण (Shravan) साेमवार. हिंदु धर्मात श्रावण महिना व सोमवारला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे नाशिक येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या 'श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराला' (Sri Kshetra Trimbakeshwar) विशेष महत्व प्राप्त होते. अख्ख्या भारतातुन भाविक येथे दर्शनासाठी (Crowd of devotees at Sri Kshetra Trimbakeshwar) येतात. श्रावणी सोमवारला दिवसभर सुरु असलेल्या पूजा-अर्चेमुळे मंदिरातील वातावरण भक्ती सागरात वाहुन निघते होते.