नाशिक- वादाच्या भोवर्यात सापडलेले सध्याचे निलंबित मुंबईचे पोलीस आयुक्त तर तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्या बेकायदेशीर कामात ढवळाढवळ केली. तसेच ते सांगतील तसे काम केले नाही म्हणून एका महिला हवालदारच्या आत्महत्या प्रकरणात आपणास अडकवल्याचा गंभीर आरोप नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी परमबिर सिंग यांच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निपुंगे यांच्या म्हणण्यानुसार जून 2016 ते ऑगस्ट 2017 दरम्यान भिवंडी येथील वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त असताना भिवंडी वाहतूक शाखेअंतर्गत येत असलेल्या नारपोली वाहतूक विभागात सिंग यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी मोठी आर्थिक देवाण-घेवाण करून नियुक्ती मिळवली होती. सहाय्यक आयुक्त असतानाही हे अधिकारी माझे कोणतेही आदेश पळत पाळत नव्हते. तसेच मोठी आर्थिक गैरव्यवहार, वाहन मालक तसेच गोदाम मालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करत होते, यात आपण हस्तक्षेप केल्याचा त्यांना राग होता. याच काळात एका महिला हवालदाराने आत्महत्या केली होती. तिने काही दिवसांपूर्वी आपल्याशी कामानिमित्त तसेच वैयक्तिक अडचणीबाबत मोबाईल द्वारे संभाषण केले होते. ती वाहतूक शाखेत कार्यरत होती, हा धागा पकडत तिच्या आत्महत्येत माझे नाव अडकवले. वास्तविक ती आत्महत्या नव्हे तर संशयास्पद खून झाल्याचं स्पष्ट असतानाही केवळ परमबिर सिंग यांच्या सांगण्यावरून आपणास अडकवले असल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केली आहे.
परमबिर सिंग यांच्यावर यापूर्वी झालेले आरोप -