नाशिक - शहरातील भद्रकाली परिसरात गोदाकिनारी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हा खून करत तरुणीचा मृतदेह फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून भद्रकाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नाशिक : गोदाकिनारी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ.. - नाशिक गुन्हे वृत्त
नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात गोदाकिनारी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हा खून करत तरुणीचा मृतदेह फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
![नाशिक : गोदाकिनारी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ.. decomposed dead body of a young woman](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9864676-746-9864676-1607857816264.jpg)
खून करून तरुणीचा मृतदेह फेकून दिल्याचा संशय -
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील गोदाकिनारी नदीच्या तपोवन मैदानातील गवतामध्ये अंदाजे वय वर्षे १७ ते २५ दरम्यानच्या स्त्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाच्या शरीरावरील कपडेही फाटलेले असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलिसांना ओळख पटविणे अवघड होत आहे. मात्र तरुणीचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचा पोलिसांनी अदाज व्यक्त केला आहे.