नाशिक- पेठ - नाशिक मार्गावर सकाळी ११ वाजता इनामबारी धरणातअनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलीस पाटील भारतीबाई गवळी यांनी पेठ पोलिसांना दिली.
इनामबारी धरणात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह, घातपाताचा संशय - found
शवविच्छेदनानंतर घातपात की आत्महत्या याचा उलगडा होऊ शकणार आहे. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
इनामबारी धरणातील अनोळखी महिलेचा मृतदेह
धरणात आढळलेल्या महिलेचेवय हे अंदाजे ३० वर्ष असून रंग गोरा, उंची ५ फूट आहे. महिलेच्या अंगावर हिरवट पिवळ्या रंगाची साडी, हिरव्या रंगाचे ब्लाऊज, हातात लाल रंगाची बांगडी, गळ्यात मंगळसूत्र, छोटी पर्स, त्यात एक हजार रुपये तसेच १०० ते १५० रुपयांची चिल्लरमिळून आली. घटनास्थळापासून काही अंतरावर काळापट्टा असलेली चप्पल मिळून आली.