महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऑक्सिजनगळती दुर्घटनेची आर्थिक मदत घेऊन सून फरार; कारवाईची सासू-सासऱ्यांची मागणी - नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना बातमी

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्देवी घटनेतील मृतकांना प्रशासनातर्फे मिळणारी दहा लाखांची मदत स्विकारून सासू-सासऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची घक्कादायक घडना उघडकीस आली आहे.

nashik oxygen leak news
नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेची आर्थिक मदती घेऊन सुन फरार, सासू-सासऱ्यांनी केली कारवाईची मागणी

By

Published : Jun 18, 2021, 5:37 PM IST

नाशिक -दोन महिन्यांपूर्वी दिवसांपूर्वीच नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्देवी घटना घडली होती. या घटनेत 22 रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेल्या एका परिवारातील सुनेने प्रशासनातर्फे मिळणारी दहा लाखांची मदत स्विकारून सासू-सासऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची घक्कादायक घडना उघडकीस आली आहे. याबाबत या वृद्ध दाम्पत्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे मदतीची याचना केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. पिरसिंग महाले आणि लता महाले असे या वृद्ध दाम्पत्यांचे नाव आहे.

प्रतिक्रिया

'न्याय मिळवून द्या अन्यथा आत्मदहन करू' -

ऑक्सिजन गळती घटनेमध्ये पिरसिंग महाले यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या घरामध्ये नांदत नसलेली त्यांच्या सूनेने मदत जाहीर होताच बळजबरीने घरी येऊन पिरसिंग आणि त्यांची पत्नी लता यांची सही आणि अंगठ्याचा ठसा घेऊन सुनेला ही मदत मिळावी असे कागदपत्रे तिने तयार केले. त्यानंतर मदतीची रक्कम हाती येताच सासू-सासऱ्यांना वाऱ्यावर सोडत सुनेने पोबारा केला. त्यामुळे महाले कुटुंबियांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे सुनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - शिवसेनेचा 55वा वर्धापन सोहळा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ऑनलाइनच्या माध्यमातून संबोधन

ABOUT THE AUTHOR

...view details