महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 10, 2020, 9:02 PM IST

Updated : Mar 10, 2020, 10:08 PM IST

ETV Bharat / city

नाशकात धुळवडीनिमित्त वीरांना नाचवण्याची 300 वर्षांपासूनची अनोखी परंपरा आजही कायम...

राज्यभरात आज धुळवडीचा उत्सव साजरा होत आहे. नाशिकमध्ये गेल्या ३०० वर्षांपासून धुळवडीच्या दिवशी वीरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. ही ऐतिहासिक दाजीबा वीराची मिरवणूक बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

धुळवडीनिमित्त वीरांना नाचवण्याची 300 वर्षांची अनोखी परंपरा
धुळवडीनिमित्त वीरांना नाचवण्याची 300 वर्षांची अनोखी परंपरा

नाशिक -राज्यभरात आज धुळवडीचा उत्सव साजरा होत आहे. सर्वत्र आज धुळवडी निमित्त रंगांची उधळण असली तरी, नाशिकमध्ये मात्र धुळवडीच्या दिवशी वीरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. 300 वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम असून, आज येथे वीरांची मिरवणूक काढण्यात आली. धुळवडीनिमित्त आयोजित ही ऐतिहासिक दाजीबा वीराची मिरवणूक बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

नाशकात धुळवडीनिमित्त वीरांना नाचवण्याची 300 वर्षांपासूनची अनोखी परंपरा आजही कायम...

राज्यभरात आज धुळवडी साजरी होत आहे. नाशिकमध्ये मात्र आजचा दिवस वीरांचा मानला जातो. वेगवेगळ्या देव देवतांचे सोंग घेऊन हे वीर नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातल्या देवांना स्नान घालतात आणि परततात. या वीरांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या दाजीबा वीराची मिरवणूक सुरू झाली आहे. शहरात रात्रभर वीरांना मिरवले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे वीर घरी परततात. हलगीच्या तालावर हे वीर नाचत असतात. त्यांच्यासोबत नागरिकही आनंदात नाचत असतात.

वीर नाचवण्याच्या परंपरेचा मान 300 वर्षांपासून बेलगावकर घराण्याकडे मान आहे. आज विनोद बेलगावकर यांना हा मान मिळाला. शहरातून निघणारा हा दाजीबा वीर नवसाला पावणारा असल्याचेही मानले जाते. त्यामुळे अनेक जणांची त्याच्यावर श्रद्धा आहे. आपल्या लहान बाळांना वीरांच्या हातात देऊन नाचवतात. त्यामुळे बाळ निरोगी आणि सदृढ होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच वीरांच्या दर्शनाला नाशिककर मोठी गर्दी करतात.

राज्यभरात आज रंग खेळले जातात. नाशिकमध्ये मात्र दाजीबा या वीराची मोठी परंपरा आहे. या वीराच्या मिरवणुकीत नाशिककर मोठ्या हौसेने सहभागी होतात.

हेही वाचा - बंजारा पाड्यावर पारंपारिक पोशाखात होळीचा सण साजरा, वृद्ध महिलांचा उत्साह शिगेला

हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने होळी-रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर, चिनी रंगांकडे पाठ

Last Updated : Mar 10, 2020, 10:08 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details