महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Navratri 2022: नाशिकच्या महिलेने केली 'अशी' कामगिरी की, सायरस पूनावालांनी नव्या कोऱ्या गाडीचे दिले गिफ्ट, पहा प्रेरणादायी गोष्ठ - डॉक्युमेंटरी मेकर माया खोडवे

Maya Khodve from Nashik: नाशिकच्या कचरा वेचक ते डॉक्युमेंटरी मेकर अशी, आपली ओळख निर्माण करणाऱ्या माया खोडवे, शिक्षण नसतांना सुद्धा त्यांनी जिद्दीच्या जोरावर मार्ग तयार सामजिक कार्यात स्वतःला वाहून दिले, वेगवेगळ्या सामजिक विषयावर 70 हुन अधिक डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून त्यांनी वंचितांचे प्रश्न सरकार दरबारी पोहचवले आहे. आणि याच कार्याची दखल घेत प्रसिद्ध उद्योजक सायरस पूनावाला Famous entrepreneur Cyrus Poonawala यांनी माया Documentary maker Maya Khodve यांना कार गिफ्ट करत त्यांचा सत्कार केला आहे.

Maya Khodve from Nashik
Maya Khodve from Nashik

By

Published : Sep 29, 2022, 4:05 AM IST

नाशिक:नाशिकच्या कचरा वेचक ते डॉक्युमेंटरी मेकर अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या माया खोडवे. शिक्षण नसतांना सुद्धा त्यांनी जिद्दीच्या जोरावर मार्ग तयार सामजिक कार्यात स्वतःला वाहून दिले. वेगवेगळ्या सामजिक विषयावर 70 हुन अधिक डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून त्यांनी वंचितांचे प्रश्न सरकार दरबारी पोहचवले आहेत. याच कार्याची दखल घेत प्रसिद्ध उद्योजक सायरस पूनावाला Famous entrepreneur Cyrus Poonawalla यांनी माया Documentary maker Maya Khodve यांना कार गिफ्ट करत त्यांचा सत्कार केला आहे.

कोण आहेत माया खोडवे :नाशिकच्या माया खोडवे त्यांचे माहेर मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील आणि सासर नाशिकच्या उपनगर भागातील आम्रपाली झोपडपट्टीतील. आयुष्यात कधी शाळेची पायरीही न चढलेल्या माया यांना परिस्थितीने अनेक प्रसंग दाखवले. घरची परिस्थितीत बिकट, त्यामुळे वडिलांनी मायाचे लवकर लग्न केले. सासरी देखील परिस्थिती हलाकीची, माहेर पाठोपाठ सासरी देखील झोपडपट्टीतील आयुष्यात वाट्याला आले. अशात परिस्थिती अशी होती की एकवेळेस भात खायचे. त्यामुळे घरातील सदस्यांसह कष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हता. रोज पन्नास रुपये मिळतील, म्हणून त्यांनी कचरा डेपोत कचरा विलगीकरणाचे काम स्वीकारले. मात्र या कामात असलेल्या महिलांना होणाऱ्या आजारांची कल्पना नाही. हे माया यांच्या लक्षात आलं आणि मग तिथून सुरू झाला त्यांचा खरा प्रवास.

सायरस पूनावाला यांनी या महिलेला केली गाडी गिफ्ट

महिलांचे संघटनमाया या कचरा वेचण्याचे काम करत असतांना पंचवटीत नाशिकमध्ये कचरा वेचणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी. या उद्देशाने एका संस्थेने पुढाकार घेतला. या संस्थेने कचरा वेचणाऱ्या महिलांच्या हक्कांपासून त्यांच्या आरोग्याबरोबरच साक्षर करण्यासाठी पाऊल टाकलं. आणि हेच ठिकाण माया खोडवे यांचा टर्निंग पॉइंट ठरला. माया यांना लिहिता, वाचता येण्याबरोबरच अभिव्यक्ती संस्थेच्या माध्यमातून कॅमेरा हाताळण्याचं प्रशिक्षण पूर्ण करत माया यांनी स्वतःला सिद्ध केलं. आर्थिक स्रोत मिळण्यासाठी व्हिडिओ व्हॅलेंटिअर्स या संस्थेने माया यांना मदत केली. या संस्थेसाठी कम्युनिटी रिपोर्टिंग करताना समाजाच्या प्रश्‍नांबरोबरच त्यांना उत्पनाचे साधन देखील निर्माण झाले. शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे प्रश्न त्यांनी डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून शासन दरबारी पोहोचवले. इथपर्यंतच न थांबता माया यांनी ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांचे वास्तव जगासमोर आणले.

महिलांना स्वयंरोजगाराचे धडेमाया खोडवे यांनी समाज जीवनाचं वास्तव दाखवणाऱ्या 70 पेक्षाही अधिक डॉक्‍युमेंटरी तयार केल्या आहेत. यातील अनेक डॉक्‍युमेंटरीची जागतिक स्तरावर दखल घेत माया यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र फक्त डॉक्‍युमेंटरीवरचं न थांबता त्यांनी आदिवासी भागातील नागरिकांचे लहासना प्रश्न वैयक्तिक स्तरावर सोडवण्याचे कार्य आजही करत आहे. तसेच कष्टकरी महिलांसाठी त्यांनी रोजगार म्हणून फिनाईल, अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देत त्यांना रोजगार देखील उपयोग करून दिला आहे.

म्हणून कार गिफ्ट केली पुनावाला सरांनी या महिलेची माहिती घेतली. अदिवासी भागात काम करते, हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी आर्थिक मदत म्हणून विचारले. तेव्हा नाही म्हटले. सध्या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसुल या आदिवासी भागांमध्ये काम करत आहे. त्या ठिकाणी असलेल्या 40 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. याबाबत तेथील नागरिकांना संघटित करून त्यांचे प्रश्न घेऊन जिल्हा प्रशासनाकडे मांडावे लागते. अशात प्रवास देखील खूप करावा लागतो आणि हीच बाब लक्षात घेऊन पुनावाला सरांनी गाडी गिफ्ट केली. त्यामुळे आता माझी जबाबदारी वाढली आहे, असे मला वाटतं अशात आता पुढे अजून चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहील असे माया खोडवे Documentary maker Maya Khodve यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details