महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाजारपेठेत नागरिकांची गर्दी, नाशिकमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - नाशिकमध्ये दहा दिवसांचे लॉकडाऊन

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने 12 मे पासून 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैद्यकीय कामाव्यतिरिक्त नागरीकांना घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे आज नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. नागरिकांची गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

By

Published : May 11, 2021, 6:03 PM IST

नाशिक -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने 12 मे पासून 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैद्यकीय कामाव्यतिरिक्त नागरीकांना घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे आज नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. नागरिकांची गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

खरेदीसाठी बाजापेठांमध्ये नागरिकांची गर्दी

नाशिक जिल्ह्यात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने यापूर्वी 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र तरी देखील नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाच्या वतीने 12 मे पासून ते 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंगळवारी शहरातील पंचवटी, इंदिरा नगर, गंगापूर रोड, मेनरोड, शिवाजी रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिरावाडी नाशिक रोड, पवन नगर, शिवाजी नगर, नाशिक रोड, सातपूर या भागांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, फळ, चिकन, मटण या सारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

हेही वाचा -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम बेगडी - भातखळकर

ABOUT THE AUTHOR

...view details