नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या 'श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात' (Sri Kshetra Trimbakeshwar) आज 'श्रावण (Shravan) सोमवारच्या' पहील्या सोमवारी भाविकांची वर्देळ (Crowd of devotees at Sri Kshetra Trimbakeshwar) दिसुन आली. आज पहाटेपासूनच महाभिषेक, श्रावणी अभिषेक, आरती अशा पूजाअर्चा सुरू असल्याने; मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून निघाला आहे.
पहिला श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात, आज पहाटे पासून भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसुन आल्या. नाशिकसह राज्यभरातून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेत. मंदिराच्या पूर्व दरवाज्याकडील मंडपात एकाच वेळी दहा ते पंधरा हजार भाविक उभे राहू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली. मात्र तो मंडपही कमी पडल्याने, भाविकांच्या रांगा मंदिराच्या बाहेर पर्यंत लागल्या होत्या. भाविकांना दर्शनासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे. तर पेड दर्शनासाठी, दोनशे रुपये देणाऱ्या भाविकांना देखील दर्शनासाठी दीड ते दोन तासाचा वेळ लागत आहे.