नाशिक- कोरोान विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात कामासाठी आलेल्या गुजरातमधील डांग जिल्ह्यातील मजूर पुन्हा परत गेले आहेत. गाड्या नसताना देखील सुरगाणा, पेठ तालुक्यातील हे मजूर पायी तर काही मिळेल त्या वाहनानी आपआपल्या घरी पोहोचले आहेत. त्यामुळे पीक कापणीला आले असतानाही मजूर मिळेनात, अशी स्थिती शेतकर्यांची झाली आहे.
कोरोनाचा परिणाम; पीक आले कापणीला, पण मजूरच मिळेना!
गव्हाचे पीक काढणीला आहे. मात्र जिल्ह्यात पीक काढण्यास मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.
दिंडोरी तालुक्याला धरणाचा तालुका म्हणून संबोधला जातो. यावर्षी सर्वच धरण परिपूर्ण भरल्यामुळे रब्बीची पिके गहू, हरबरा, मका, कुळीद, वटाणा, ही पिके प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यात यावर्षी अंदाजे सहा ते सात हेक्टरवर गव्हाचे पीक घेतले गेले. परंतू यावर्षी रब्बी पिकाला हवामान पोषक असल्यामुळे या वर्षी तालुक्यात विक्रमी उत्पादन झाले. गव्हाच्या सोंगणीच्या वेळीच कोरोणा व्हायरलच्या पार्श्र्वभूमीवर भारतात संचारबंदी झाल्यामुळे मजुरी करण्यासाठी आलेल्या बाहेरील मजुरांनी घरचा रस्ता धरला. त्यामुळे गव्हाची सोंगणी न झाल्यामुळे गहू तसाच उभा आहे. यावर्षी चांगले पीक आल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.