महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Water Issue in Nashik: नाशिकवर पाणी कपातीचे संकट,गंगापूर धरणात 25 दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक

गंगापूर धरणात (Gangapur Dam) 25 दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याने नाशिकवर पाणी कपातीचे (Nashik water cut) संकट ओढावले आहे. रविवार पर्यंत चांगला पाऊस झाला नाही तर महानगरपालिका (Municipal Corporation) पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गंगापूर धरण
गंगापूर धरण

By

Published : Jul 8, 2022, 1:59 PM IST

नाशिक:राज्यात एकीकडे पावसाने जोर वाढला असून दुसरी कडे नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पावसाची प्रतिक्षा आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाने जोर धरला नाही. गंगापूर,मुकणे आणि दारणा धरणात सद्यस्थितीत महानगरपालिकेचे 598 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे नाशिक शहरावर पाणी कपातीचे संकट आले आहे.

धरणाचे 100 दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणातून उचलण्यास जलसंपदाने परवानगी दिली नसून सद्यस्थितीत शिल्लक असणाऱ्या 498 दशलक्ष घनफूट पाण्याचा विचार केला तर अवघे 25 दिवस पुरेल इतकेच पाणी गंगापूर धरणा (Gangapur Dam) मध्ये आहे,दरम्यान रविवार पर्यंत वाट बघून समाधानकारक पाऊस न झाल्यास सोमवारी बैठकीद्वारे पाणी कपाती बाबत आयुक्त निर्णय घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

5600 दशलक्ष पाणीसाठा आरक्षित-नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरणातून (Gangapur Dam) 4 हजार,मुकणे धरणात 1500 तर दारणा धरणात (Darana dam) 100 अशाप्रकारे एकूण 5600 दशलक्ष पाणीसाठा आरक्षित असून आत्तापर्यंत 5 हजाराहून अधिक दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. त्यात दारणा धरणातून 100 दशलक्ष घनफूट पाणी उचलता आलेले नसून हे पाणी गंगापूर धरणातून मिळण्यासाठीची अद्याप मान्य मिळालेली नाही.



दुबार पेरणीचे संकट-नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 150 मिली मीटर पाऊस झाला असून,जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून,पुढील काही दिवसातच समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकते. जिल्ह्यातील धरणातील मोठ्या धरणात पाणी साठा आहे. गंगापूर धरण 26 टक्के, मुकणे धरण 36 टक्के, चनकापूर धरण 20 टक्के. दारणा धरण 28 टक्के, ओझरखेड धरण 26 टक्क, गिरणा धरण 34 टक्के, कडवा धरण 13 टक्के व करंजवन धरण 11 टक्के शिल्लक आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे २५ टक्के पाणीसाठा-जुलै महिना उजाडला तरीही नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात एकूण २४ मोठे व मध्यम धरण प्रकल्प असून यात सध्या फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही सध्या ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी हा कमी आहे. या सर्व परिस्थितीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान सध्याचा पाणीसाठा आणि शहराची गरज याचा आढावा महापालिकेकडून घेण्यात आला असता पुढच्या आठवड्यात पाऊस येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.मात्र जर असे झाले नाही तर येत्या सात दिवसात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा:नाशकात गंगापूर धरण परिसरात पाऊस न झाल्यास पाणी कपातीचा निर्णय घेणार - आयुक्त कैलास जाधव

हेही वाचा:नाशिक जिल्ह्यात पाणीबाणीची शक्यता गडद, 24 धरणांमध्ये केवळ 26 टक्के पाणीसाठ

हेही वाचा:Dam Catchment Area : कोयना धरणात प्रतिसेकंद 6468 क्युसेक पाण्याची आवक; पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला

ABOUT THE AUTHOR

...view details