नाशिक - येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiy Marathi Sahitya Sammelan) समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोना बाधित (Two publishers from Pune Found Covid 19 Affected)असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संमेलनासाठी आलेल्या साहित्यिकांची चिंता वाढली आहे.
आता या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी पालिकेने धावपळ सुरू केली आहे. या दोन व्यक्तींना त्यांची तयारी असल्यास बिटको रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले जाणार असून, नसल्यास पुणे (PMC) आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला (PCMC) कळवून त्यांच्यावर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे (Dr. Bapusaheb Nagargoje) यांनी दिली आहे. यातील एक जण पिंपरीचा तर, दुसरा आळंदी येथील रहिवासी आहे.
नाशिकच्या साहित्य संमेलनात आढळले दोन कोरोनाबाधित रुग्ण, साहित्यिकांमध्ये खळबळ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiy Marathi Sahitya Sammelan) साहित्यिकांची धाकधूक वाढली आहे. संमेलनात सहभागी झालेल्यांपैकी २ प्रकाशक हे कोरोनाबाधित आढळून आल्याने (Two publishers from Pune Found Covid 19 Affected) खळबळ उडाली आहे.
शरद पवारांनी दिली भेट
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून भुजबळ नाॅलेज सिटित (Bhujbal Knowledge City) अखिल भारतीय ९४ वे साहित्य संमेलनात सारस्वतांचा मेळावा भरला आहे. विविध कार्यक्रम, परिसंवाद, बालकट्टा, गजल आदी कार्यक्रमांनी संमेलनात रंग भरले आहे. आज संमेलनाचा समारोप खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्या भाषणाने होणार आहे. पवार त्यासाठी काल रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले. सकाळीच त्यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली. संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना संमेलनाची माहिती दिली.