नाशिक- जिल्ह्यातील दोन वयोवृद्धानां कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. यात नाशिकच्या सातपूर -अंबड लिंक रोड वरील एका 63 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली असून मालेगाव येथील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 48 वर जाऊन पोहचला आहे.
नाशिक जिल्ह्यात दोन वयोवृद्धांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांचा आकडा 48 वर - नाशिक जिल्ह्यात दोन वयोवृद्धानां कोरोनाची लागण
नाशिक जिल्ह्यातील दोन वयोवृद्धानां कोरोनाची लागण झाल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 48 वर जाऊन पोहचला आहे.
नाशिकच्या सातपूर -अंबड लिंक रोड वरील एका 63 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे कळताच महानगरपालिका प्रशासने पोलिसांच्या मदतीने हा भाग सील केला आहे. या महिलेच्या घरच्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून त्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच या भागातील नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार आहे. ज्या व्यक्तींना कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्यांची देखील आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितलं.
नाशिक मध्ये दिनांक 16 एप्रिल रोजी 6 वाजता कोरोना संशयित रुग्णांचे 65 अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेत. याचा 54 अहवाल हे सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांचे असून 11 अहवाल हे अपोलो हॉस्पिटल येथील रुग्णांचे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व रुग्णांचे संपर्क हे उच्च जोखमीतील होते.