महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकातील अनेक परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट; शहरातील रुग्णसंख्या हजारावर

शहरात गेल्या २८ दिवसांत १,०५२ रुग्ण आढळले आहे. पंचवटी, वडाळा, जुने नाशिक, हिरावाडी, फुलेनगर हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. जुने नाशिक भागातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू घोषित करत आपले व्यवसाय तीन दिवस बंद ठेवले.

corona patients found in nashik
नाशिक कोरोना अपडेट

By

Published : Jun 20, 2020, 12:35 PM IST

नाशिक- केंद्र सरकारने १ जूनपासून अनलॉक-१ जाहीर केला. त्यानंतर नाशिक शहरात कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. शहरात गेल्या २८ दिवसांत १,०५२ रुग्ण आढळले आहे. पंचवटी, वडाळा, जुने नाशिक, हिरावाडी, फुलेनगर हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. जुने नाशिक भागातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू घोषित करत आपले व्यवसाय तीन दिवस बंद ठेवले. तसचे पंचवटी भागातील नागरिकही पुढच्या काही दिवसांत जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत निर्णय घेणार आहेत. १९ जून रोजी शहरात ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात २६८ नवे संशयित रुग्ण -
जिल्ह्यात १९ जून रोजी २६८ कोरोना संशयित रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी जिल्हा रुग्णालयात १४, महानगरपालिका रुग्णालयात ११९, मेडिकल कॉलेज २, मालेगावात महानगरपालिका रुग्णालय ५, ग्रामीण रुग्णालय ५, ग्रामीण रुग्णालय डीसीएचसीमध्ये १२८ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरासोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगाने प्रयत्न करत आहे.

नाशिक जिल्ह्याची परिस्थिती -
नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित - २,५१६
कोरोनामुक्त रुग्ण - १,५२०
एकूण मृत्यू - १५३
उपचार घेत असलेले रुग्ण - १,०७५
नाशिक जिल्ह्यात एकूण मृत्यू - १५३
नाशिक ग्रामीण - २३
नाशिक मनपा - ५१
मालेगाव मनपा - ६९
जिल्ह्याबाहेरील रुग्ण - १०

ABOUT THE AUTHOR

...view details