महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये बेड मिळेनात; रुग्णाला महापालिकेच्या मुख्यालयात आणल्याने खळबळ - नाशिक कोरोना घडामोडी

शहरातील अनेक रुग्णालये फिरूनही दोन कोरोनाबाधितांना खाटच मिळत नसल्याने या रुग्णांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गांधीगिरी आंदोलन केले. या गांधीगिरी आंदोलनामुळे पालिका परिसरात एकच खळबळ उडाली.

नाशिक
नाशिक

By

Published : Mar 31, 2021, 9:55 PM IST

नाशिक- शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असून रुग्णांना खाट (बेड) तसेच ऑक्सिजन, वेंटिलेटर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी शहरातील नागरिक मनपा प्रशासनाकडे करत आहेत. शहरातील अनेक रुग्णालये फिरूनही दोन कोरोनाबाधितांना खाट मिळत नसल्याने या रुग्णांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गांधीगिरी आंदोलन केले. या गांधीगिरी आंदोलनामुळे पालिका परिसरात एकच खळबळ उडाली.

माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते

दोन रुग्णांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गांधीगिरी आंदोलन केल्याने त्यांना तातडीने मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची हेळसांड सातत्याने होत आहे. परंतु, या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे खाट उपलब्ध होत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे या रुग्णांचे हाल सातत्याने होत आहेत. सिडकोच्या कामटवाडा येथे राहणारे भाऊसाहेब कोळे यांना शहरातील अनेक रुग्णालये फिरल्यानंतर देखीलसुद्धा कोठेही खाट मिळाला नाही. यामुळे दिवसभर फिरून वैतागलेल्या रुग्णाचे नातेवाई आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक डोके यांनी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ऑक्सिजन सिलेंडर हातात घेऊन रुग्णासमवेत पालिका मुख्यालय गाठले आणि गांधीगिरीने आंदोलन केले.

महापालिकेत आल्यावरच बेड मिळतो...

सिडको कामटवाडा परिसरातील बाळासाहेब कोळे यांचा तीन दिवसांपूर्वी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु, पहिल्या दिवशी तब्येत चांगली होती दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांचे नातेवाईक त्यांना अनेक रुग्णालयांमध्ये घेऊन गेले. परंतु, रुग्णालयांमध्ये खाटच उपलब्ध नसल्याचे कारण सांगत रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिला. अखेर रुग्णालयात घेतले जात नसल्याने कोळे याना घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आलो आणि बेड महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे. ही दुर्दैवी गोष्ट असून महापालिकेत आल्यावरच बेड मिळतो हे सिद्ध झाल असल्याचं दीपक डोके सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details