महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंधांसाठी ब्रेल लिपीतील कोरोना माहिती पुस्तिका, नाशकातील संस्थेचा उपक्रम - नाशिक अंध ब्रेल लिपी कोरोना माहिती पुस्तिका बातमी

अंध लोक या कोरोना परिस्थितीच्या भीषण वास्तवापासून अनभिज्ञ आहेत. हे बघता नाशिकच्या दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया या संस्थेने अंध मुलांसाठी ब्रेल लिपीत कोरोना माहिती पुस्तिका तयारी केली आहे. नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले.

corona blind book
अंधांसाठी ब्रेल लिपीतील कोरोना माहिती पुस्तिका, नाशकातील संस्थेचा उपक्रम

By

Published : Jul 5, 2020, 11:51 AM IST

Updated : Jul 5, 2020, 12:08 PM IST

नाशिक - राज्यातील इतर जिल्ह्यांपाठोपाठ नाशिक जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागलाय, त्यामुळे सर्वच नागरिक सद्या चिंतेत आहेत. मात्र, या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतोय तो अंध व्यक्तींना.

अंधांसाठी ब्रेल लिपीतील कोरोना माहिती पुस्तिका, नाशकातील संस्थेचा उपक्रम
त्यांना वर्तमानपत्र किंवा इतर गोष्टींवरून कोरोणाची माहिती पुरेसी मिळत नाही. यामुळे आद्यपही अनेक अंध लोक या कोरोना परिस्थितीच्या भीषण वास्तवापासून अनभिज्ञ आहेत. हे बघता नाशिकच्या दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया या संस्थेने अंध मुलांसाठी ब्रेल लिपीत कोरोना माहिती पुस्तिका तयारी केली आहे. नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले.
अंधांसाठी ब्रेल लिपीतील कोरोना माहिती पुस्तिका, नाशकातील संस्थेचा उपक्रम

अरुण भारस्कर - दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया संस्था अध्यक्ष

दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया संस्थेने तयार केलेल्या कोरोना माहिती पुस्तिकेमुळे अंध व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. त्यांना ही माहिती पुस्तिका वाचून कोरोना संदर्भात कशी काळजी घेतली पाहिजे हे समजणार आहे. सुरवातीला या संस्थेने १५०० पुस्तिका छापल्या असून याचे अंध विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.

अंधांसाठी ब्रेल लिपीतील कोरोना माहिती पुस्तिका, नाशकातील संस्थेचा उपक्रम
Last Updated : Jul 5, 2020, 12:08 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details