नाशिक - केंद्र शासनाने पारित केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. हे कायदे तातडीने रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने एमजी रोड परिसरातील काँग्रेस भवन बाहेर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
नाशकात कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन; किसान अधिकार दिवस पाळत नोंदवला निषेध
मागील महिन्यात केंद्र शासनाने तीन कृषी कायदे पारित केले आहेत. मात्र, हे तिन्ही कायदे शेतकर्यांसाठी घातक असून यातून फक्त शेतकऱ्यांचे नुकसानच होणार असल्याचा आरोप करत देशासह राज्यभरातून या कायद्यांना तीव्र विरोध केला जात आहे. हे कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यव्यापी किसान अधिकार दिवस पाळण्यात आला होता.
मागील महिन्यात केंद्र शासनाने तीन कृषी कायदे पारित केले आहेत. मात्र, हे तिन्ही कायदे शेतकर्यांसाठी घातक असून यातून फक्त शेतकऱ्यांचे नुकसानच होणार असल्याचा आरोप करत देशासह राज्यभरातून या कायद्यांना तीव्र विरोध केला जात आहे. गेल्या महिनाभरापासून हे कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यव्यापी किसान अधिकार दिवस पाळण्यात आला. केंद्र शासनाने पारित केलेले हे कायदे तातडीने रद्द करावे, यासाठी याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या एमजीरोड परिसरात असलेल्या काँग्रेस भवन बाहेर आंदोलन करण्यात आले आहे..
केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता हे तिन्ही कायदे तातडीने रद्द करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तर ही कायदे रद्द न केल्यास येत्या काळात अशाचप्रकारे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकाकडून देण्यात आला आहे.