नाशिक -फास्टॅगबाबत पाहिजे तशी जनजागृती न झाल्याने आणि फास्टॅगची कमतरता, यामुळे 15 डिसेंबरला करण्यात आलेली फास्टॅगची सक्ती महिनाभरासाठी शिथिल करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना आता पैसे देऊन टोलनाका ओलांडता येणार आहे. टोलनाक्यावर होणारी गर्दी, वायू प्रदूषण आणि वाहनधारकांना टोल नाका क्रॉस करण्यासाठी लागणार वेळ पाहता, केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडण्यासाठी वाहनावर फास्टॅग असणे सक्तीचे केले होते.
हेही वाचा... आपल्यात आता कोणतेही नाते उरले नाही... नात्यांचे तसे ओझेच होते, तेही उतरले!
वाहनावर लावण्यात आलेला फास्टॅग स्कॅन झाल्यावर वाहनधारकांना काही वेळातच टोल क्रॉस करता येणार आहे. त्यांची टोलची रक्कम ही त्यांच्या फास्टॅग अकाउंटमधून जाणार असल्याने वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले. तर फास्टॅगमुळे ऑनलाईन व्यवहार होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे अनेक वाहनधारकांनी म्हटले आहे.
हेही वाचा... ठाणे : कल्याणातील वीटभट्टीवरून 'श्रमजीवी'ने केली मजुरांची मुक्तता
नाशिक- मुंबई महामार्गावरील घोटी येथील टोलनाक्यावर 10 मार्गिका असून त्यापैकी 4 मार्गिका फास्टॅगसाठी आहेत. इतर 6 मार्गिका रोख व्यवहारासाठी ठेवण्यात आल्या आहेत. फास्टॅग मिळण्यासाठी काही बँकांनी टोलनाक्यावर देखील काउंटर उघडले आहे.