नाशिक - 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असे म्हणत मालेगाव तालुक्यासह नाशिकच्या ग्रामीण भागात होळी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. मालेगाव येथे होळीमध्ये कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. मालेगाव शहरातील 12 बांगला भागात कोरोना विषाणूचे होळीत दहन करण्यात आले.
मालेगाव शहरात 'कोरोना विषाणू'चे दहन - Agriculture Minister Dada Bhuse
देशभरात होळीचा सण कोरोनाच्या प्रभावाखाली साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील मालेगाव शहरात 'कोरोना विषाणू'चे दहन करत होळी साजरी करण्यात आली.
मालेगाव शहरात कोरोना विषाणूचे दहन
हेही वाचा...कर्नाटक अन् पंजाबमध्ये आढळले कोरोनाचे नवे रुग्ण, देशात आतापर्यंत ४५ जणांना लागण..
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव बाजार समितीत असलेल्या शिवभोजन थाळी गृहात जाऊन तेथील शेतकऱ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. भुसेंनी यावेळी शिवभोजन घेणाऱ्यांना जिलेबी भरवत त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.