नाशिक - पहिल्याच पावसात त्र्यंबकेश्वर गावात पाणी साचल्यानंतर, स्थानिक प्रशासनाचे सगळे दावे धुवुन निघाले होते. याच पार्श्वभुमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन करत प्रशासनाला पावसाळ्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्लक्ष करणाया अधिकाऱ्यांवर कारवाइचा बडगा देखिल उगारला आहे.
त्र्यंबकेश्वरच्या पूरग्रस्त भागात कायमस्वरूपी उपाययोजना करा - जिल्हाधिकारी सुरज माढरे - solution
मान्सुनने नाशिक जिल्ह्यात हजेरी लावल्यानंतर पहिल्याच पावसात त्र्यंबकेश्वरमध्ये पाण्याचा धुमाकुळ बघायला मिळाला. संपुर्ण शहरात पाणी शिरल्याने रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यानी पाण्याचा प्रवाह पाईपलाईनच्या माध्यमातुन त्र्यंबकेश्वर शहराच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.
मान्सुनने नाशिक जिल्ह्यात हजेरी लावल्यानंतर पहिल्याच पावसात त्र्यंबकेश्वरमध्ये पाण्याचा धुमाकुळ बघायला मिळाला. संपुर्ण शहरात पाणी शिरल्याने रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी तसेच पर्यावरणाचे अभ्यासक देखिल उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यानी पाण्याचा प्रवाह पाईपलाईनच्या माध्यमातुन त्र्यंबकेश्वर शहराच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही वर्षात त्र्यंबकेश्वरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोदावरीच्या पात्रावर अतिक्रमण झाले आहे. शहरातील नैसर्गिक नाले बुझवुन त्यावर अनधिकृत बांधकाम केल्याने त्र्यंबकेश्वरचे केदारनाथ होण्याची भिती आहे. त्यामुळे किमान प्रशासनाने यात लक्ष घालुन अनधिकृत बांधकामांवर कारवाइची मागणी वाढु लागली आहे. दरम्यान प्रत्येक पावसाळ्यात त्र्यंबकेश्वरच्या कॅचमेंट एरियात प्रचंड पाऊस होत असतो. याच पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास आसपासच्या गावांना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. यामुळे त्र्यंबकेश्वर गावात देखिल पाणी शिरणार नाही असे नियोजन प्रशासनाने करावे अशी गावकऱयांची मागणी आहे.