महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...तर लॉकडाऊनमधील शिथिलता मागे घ्यावी लागेल - जिल्हाधिकारी सुरज मांढरे

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आल्याने तब्बल अडीच महिन्यानंतर शहरातील सर्व बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या आहेत. आहेत. मात्र दुकाने उघडताच बाजारपेठांमध्ये नागरीकांची तोबा गर्दी केलीय. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

nashik corona news
दुकाने उघडताच बाजारपेठांमध्ये नागरीकांची तोबा गर्दी केलीय.

By

Published : Jun 9, 2020, 5:30 PM IST

Updated : Jun 9, 2020, 8:07 PM IST

नाशिक - लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आल्याने तब्बल अडीच महिन्यानंतर शहरातील सर्व बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या आहेत. आहेत. मात्र दुकाने उघडताच बाजारपेठांमध्ये नागरीकांची तोबा गर्दी केलीय. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची परिस्थिती शहरात आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात कोरोनाबधितांचा आकडा देखील वाढलाय. त्यामुळे येत्या दोन दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास सर्व निर्बंध मागे घेण्यात येतील, असे संकेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

दुकाने उघडताच बाजारपेठांमध्ये नागरीकांची तोबा गर्दी केलीय.
मागील अडीच महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद होत्या. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शासनाने काही अंशी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. दुकाने सुरू करताना सम-विषम तारखेच्या फॉर्म्युल्यावर अंमल ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आली. मात्र दुसऱ्याचं दिवशी शहरातील सर्व दुकाने सुरू उघडण्यात आली.
दुकानदारांनी देखील शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. नागरीकांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील दहीपूल, भद्राकाली, गाडगे महाराज चौक, शालीमार महात्मा गांधी रोड, वकीलवाडी, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार, कापड बाजारपरिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. नागरिकांना या नियमांचा विसर पडल्याचे चित्र आहे.

गर्दीत देखील नागरिकांनी मास्क नावापुरतेच घातल्याचे दिसून आले. गेल्या चार दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. एक जूनला शहरात 234 कोरोनाबाधित रुग्ण होते. आता हा आकडा 450 वर गेला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत दुकानदार तसेच नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन न केल्यास सर्व शिथिलतेबाबत पुनर्विचार करावा लागेल, असे संकेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहे.

Last Updated : Jun 9, 2020, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details