नाशिक- देशभरामध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याचेच पडसाद नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेतही पाहायला मिळाले. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली.
सावरकरांच्या मुद्द्यावरून नाशिक पालिकेत भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी
देशभरामध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याचेच पडसाद नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेतही पाहायला मिळाले.
हेही वाचा -विश्वास नांगरे पाटील यांनी केली 'त्या' मुलाची इच्छा पूर्ण
सावरकरांबद्दल चुकीचे वक्तव्य केले म्हणून निषेधाचा प्रस्ताव भाजपने दिला होता. त्याचे वाचन सुरू होताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले आणि एकच गोंधळ सुरू झाला. भाजपने बांगड्या दाखवत राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र, त्यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी चप्पल हातात घेत मोदी आणि शाहांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सेना नगरसेवक मात्र तटस्थ राहून हा सगळा गोंधळ पाहत होते.