नाशिक -गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झाले आहे. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचा देखील आहे. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केले पाहिजे. एका हाताने टाळी वाजत नाही, अशा शब्दात अन्न आणि नागरी पुवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका केली आहे.
टाळी एका हाताने वाजत नाही, भुजबळांची राज्यपालांवर टीका - अन्न आणि नागरी पुवठामंत्री छगन भुजबळ
गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झाले आहे. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचा देखील आहे. एका हाताने टाळी वाजत नाही, अशा शब्दात अन्न आणि नागरी पुवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका केली आहे.
राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केले पाहिजे -
राज्यपालांच्या विमान प्रवासावरून सध्या राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. याबाबत शुक्रवारी नाशिक येथे बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत. प्रत्येकाची हक्क आणि कर्तव्य वाटून दिलेले आहेत. मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घ्यायचे आणि राज्यपालांनी ते मंजूर करायचे. मंत्रिमंडळ हे या राज्याचे प्रमुख कारभारी आहेत. त्याच्या पाठीमागे उभे राहणे हे राज्यपालांचे काम आहे. राज्यपालांचा जसा मान आहे. तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केले पाहिजे असे भुजबळ यानी मत व्यक्त केले आहे.