नाशिक यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसेसची पाहणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. नाशिकमध्ये बसला आग लागून १२ प्रवासी होरपळून ठार झाल्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसेस तपासले आहेत. त्यात एसी स्लीपर कोच बसेस प्रवास योग्य आहेत का ? बसची आंतर्बाह्य उंची, लांबी, रुंदी, तसेच दोन बर्थ मधील गँगवे, इमर्जन्सी डोअर व पॉइंटेड हॅम्मर, जीपीएस यंत्रणा, स्पीड गव्हर्नर आदी संपुर्ण बाबी तपासले आहेत. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कसे बसविण्यात आले याचीही माहिती घेतली जात आहेत.
आगीमुळे प्रवाशांचा कोळसा -औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की, त्यात 14 पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बस चालकाचाही मृत्यू झाला.
चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसेसची पाहणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली बसमध्ये स्फोट -यवतमाळ येथून ही बस काल रात्री नाशिकच्या दिशेने रवाना झाली. त्यातून 30 पेक्षा अधिक प्रवाशी प्रवाशी होती. नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकून फुटून सर्वत्र डिझेल पसरले आणि दुसरीकडे बस अन्य एका चारचाकीला धडकली. त्यानंतर लगेचच बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवासी झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच भाजून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत:दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे Guardian Minister Dada Bhuse यांनी मृताच्या नातेवाईकाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा assistance of Rs 5 lakh to the kin of the deceased शासनाने केली असल्याचे सांगितलं. तसेच ते शासकीय आयोजित दौरा चंदिगढ येथे असताना पालकमंत्री दादा भुसे तेथून त्वरित माघारी फिरलेले आहेत. सध्या ते घटनास्थळी दाखल होण्यासाठी जलदगतीने निघालेले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश :नाशिक बस दुर्घटनेच्या चौकशीचे देखील आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. दुर्घटनेसाठी कोणी जबाबदार असल्यास कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.