महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Marathi Sahitya Sammelan - 93 वर्षांत प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बाल मेळाव्याचे आयोजन - बाल साहित्य मेळाव्याचे आयोजन

नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Marathi Sahitya Sammelan) 93 वर्षांनंतर प्रथमच बाल साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Marathi Sahitya Sammelan
बाल मेळावा आयोजन साहित्य संमेलन

By

Published : Nov 20, 2021, 4:58 PM IST

Updated : Nov 20, 2021, 6:32 PM IST

नाशिक -नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Marathi Sahitya Sammelan) 93 वर्षांनंतर प्रथमच बाल साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा -कृषी कायदे रद्द करण्याचा मोठेपणा मोदींनी दाखवला, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोल‍ा

मेळावा समितीचे पदाधिकारी म्हणाले की, 4 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (minister Chhagan Bhujbal), माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस उप महानिरीक्षक बी.जी. शेकर, अ.भा. मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर उपस्थित राहणार आहे.

पुढील कार्यक्रम होणार

4 डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते साडेपाच या वेळेत बालकवी, बालकथा अभिवाचन होणार आहे, सायंकाळी साडेपाच ते सायंकाळी सहा या वेळेत निमंत्रित बालकवींचे अभिवाचन होणार आहे. यावेळी सूर्यकांत मालुसरे, पृथ्वीराज कपूर, संजय पेंडसे, आश्लेषा महाजन, विनोद सीनकर, किरण भावसार, संदीप देशपांडे, संजय वाघ, प्रशांत गौतम, संतोष हुदळीकर हे उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी रविवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत बदलत्या काळातील बालसाहित्य या विषयावर राजू तांबे, रेणू गावस्कर ,अर्चना कुडतरकर, पृथ्वीराज तौर, प्रा. भास्कर बडे, संतोष हुदलीकर हे मार्गदर्शन करणार आहेत, सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत मुलांशी गप्पा गोष्टी, सकाळी साडेदहा ते अकरा जाणून घेऊ नवे शैक्षणिक धोरण, यात अकोल्याचे (विदर्भ) सचिन जोशी, नाशिकचे सचिन उषा विलास जोशी सहभाग घेणार आहेत. साडेअकरा ते सव्वाबारा या वेळेत खगोल ते भूगोल या विषयावर राजीव तांबे, आनंद घैसास मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा -leopard attack नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालके गंभीर जखमी

Last Updated : Nov 20, 2021, 6:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details