नाशिक - नाशिक शहरात अनेक रहदारीच्या रस्त्यांवर लहान मुले मुली भिक मागताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला बालविकास समिती व नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात भिक मागणाऱ्या 36 हून अधिक अल्पवयीन मुलामुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 36 पैकी 14 मुलामुलींचे पुनर्वसन करत त्यांची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे.
हेही वाचा -गोदावरी नदीपात्रात मोटरसायकल पडून दोन मित्रांचा मृत्यू
शहरात अनेक सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलामुलींचे पुनर्वसन होण्याकरिता चाईल्ड हेल्प लाईन व नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे संयुक्तिक मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात सिग्नल, उड्डाणपुल, रहदारीच्या ठिकाणी अठरा वर्षांच्या खालील भिक मागणाऱ्या तब्बल 36 मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करत जिल्हा बाल समितीसमोर हजर करण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या काही मुलामुलींचे पालक आल्याने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तर मुलांना भिक मागण्यास लावू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी समज पोलिसांनी संबधित पालकांना दिली. ही मोहीम महिला सुरक्षा विभाग भरोसा कक्षाच्या ज्योती आमणे, स.पो.नि संगीता गावीत, आशा सोनवणे, लिला सुकटे, मालू राऊत, मनीषा जाधव आदींसह महिला बालकल्याण अधिकारी व सदस्यांनी यशस्वीरित्या राबविली.
हेही वाचा -Cyber Police Action : सावधान; सोशल मीडियावर अश्लिल फोटो, व्हिडिओ शेअर केल्यास घडू शकते जेलवारी