येवला -शहर तसे तालुक्यात कोरोना रुग्ण कमी मात्र तापाचे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू आजाराने त्रस्त झाले आहेत.
मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले कोरोनाचे प्रमाण कमी झाला आहे. मात्र, येवलेकरांच्या नशिबी आता 'ताप' आला आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला शहरात चिकनगुणिया, टायफाईड, मलेरिया, डेंग्यू , सदृश्य आजाराने डोके वर काढले आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी दवाखाने सध्या ' हाऊसफुल्ल ' झालेले आहेत. या साथीच्या आजारांमुळे आरोग्य विभागाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना या आजारांबाबत ध्वनिक्षेपकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान
घराच्या आजूबाजूला पडलेल्या टाकाऊ वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यावर डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे डास वाढल्याने हे आजार बळावले आहेत.घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाण्याचा टाक्या स्वच्छ करून एक दिवस कोरडा करावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कुप्पास्वामी यांनी केले आहे.