महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bus Fire in Nashik : बस दुर्घटनेची होणार चौकशी;  मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी - मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी नाशिकमध्ये खाजगी प्रवाशी बस आगीत होरपळलेल्या ( private passenger bus caught fire ) रुग्णायात जाऊन भेट घेतली यावेळी त्यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः जाळून मृत्यू ( passenger burnt to death ) झाला.

Bus Caught Fire in Nashik
मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

By

Published : Oct 8, 2022, 3:26 PM IST

Updated : Oct 8, 2022, 3:49 PM IST

नाशिक -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी नाशिकमध्ये खाजगी प्रवाशी बस आगीत होरपळलेल्या (private passenger bus caught fire) रुग्णायात जाऊन भेट घेतली यावेळी त्यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

मुख्यमंत्र्यांनी दिल्या कारवाई करण्याच्या सूचना -यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, मी अपघातस्थळी भेट दिली आहे, जखमींचीही भेट घेतली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर, गंभीर जखमींना 2 लाख रुपये देण्यात येणार आहेत. नाशिकमधील ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्या ठिकाणे शोधून कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मृतांना 5 लाखांची मदत - नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः जाळून मृत्यू (passenger burnt to death) झाला आहे. या प्रकरणी मयतांच्या नातेवाईकांना 5 लाख राज्यसरकारतर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाना 2 लाखांची मदत शिंदे यांनी जाहीर केली. यावेळी गिरिश महाजन, दादा भुसे आदी उपस्थित होते.

Last Updated : Oct 8, 2022, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details