महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Swami Sagarand Saraswati Maharaj : महाराजांच्या जाण्याने पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपले - छगन भुजबळ - स्वामी सागरानंद सरस्वती महाराज मृत्यू

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष (akhil bhartiya akhada parishad) स्वामी सागरानंद सरस्वती महाराज (Swami Sagarand Saraswati Maharaj) यांच्या निधनावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शोक व्यक्त केला आहे.

Swami Sagarand Saraswati Maharaj
Swami Sagarand Saraswati Maharaj

By

Published : Oct 8, 2022, 1:49 PM IST

नाशिक: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष (akhil bhartiya akhada parishad) स्वामी सागरानंद सरस्वती महाराज (Swami Sagarand Saraswati Maharaj) यांच्या निधनावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शोक व्यक्त केला आहे. छगन भुजबळ म्हणाले, स्वामीजींचे नुकतेच महानिर्वाण झाल्याचे दुःखद वृत्त कळाले. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून माझे पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे.

भुजबळांचा शोक संदेश:शोक संदेशात छगन भुजबळ म्हणतात, स्वामीजींना सिंहस्थ कुंभमेळ्याची खडान् खडा माहिती होती. ते जाणकार संत परंपरेतील एक श्रेष्ठ महात्मे व जुन्या पिढीतील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. गेल्या अनेक दशकांपासून ते त्र्यंबकेश्वरात वास्तव्यास होते. माझ्या कार्यकाळातील दोन कुंभपर्व नियोजनात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच नाशिकच्या विकासात त्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सागरानंद सरस्वती स्वामीजींनी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्वाचे योगदान दिले आहे. श्री स्वामीजींचा अख्या भारतभरात मोठा शिष्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांचा संपूर्ण भक्त परिवार पोरका झाला असून मी एक पितृतुल्य व्यक्तिमत्व गमावले आहे. मी व माझे कुटुंबीय स्वामीजींच्या भक्तीपरीवाराच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पवित्र स्मृतिस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे छगन भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशाच्या शेवटी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details