नाशिक - पुण्यात सध्या भयंकर पूरस्थिती आहे. मात्र, तरीही त्यावर बोलण्याऐवजी राज्यातील मंत्री हे तिकीट वाटपावर चर्चा करण्यात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारी बैठक होत आहे. या बैठकीसाठी भुजबळ यांना रवाना व्हायचे हाते. यासाठी भुजबळ यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातील बैठका व इतर कार्यक्रम रद्द केले. नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या एका बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा... पुण्यात पावसाचे थैमान; चारचाकी गेली वाहुन, कार चालकाचा मृत्यू
राज्यातील नेते जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत
सांगली येथील पुरावेळीही राज्यातील मंत्री महाजनादेश यात्रेत अडकले होते. यामुळेच त्यांनी पुराकडे लक्ष दिले नाही. आताही पुण्यात सध्या पूरपरिस्थिती गंभीर आहे. मात्र, राज्यात पुण्यासह कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र युतीच्या जागा वाटपात व्यस्त असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. राज्यातील मंत्री तिकीट वाटपावर चर्चा करत आहेत. यापेक्षा त्यांनी पुण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, नंतर तिकीट वाटपाकडे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
पवार साहेबांना पाठींबा देण्यासाठी मुंबईला जाणार