नाशिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात मी वंदे मातरम म्हणणार नाही. मी जय महाराष्ट्र म्हणेन अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ Former Minister Chhagan Bhujbal यांनी व्यक्त केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार State Minister Sudhir Mungantiwar यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यावर वंदे मातरम म्हणण्याचे फर्मान काढले आहे. त्यावर भुजबळांनी नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताताना सरकारच्या फर्मानवर टीका केली.
सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता फोनवरून बोलताना वंदे मातरम म्हणणे सक्तीचे केले आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. मुनगंटीवार यांच्या या निर्णयाला रझा अकादमीने जोरदार विरोध केला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वी जय महाराष्ट्र म्हणायचे. त्यामुळे आता जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.