नाशिक - चांद्रयान 2 मोहिमेत विक्रम लँडरच्या ट्रान्समिटरवर लुनार डस्ट आल्यामुळे इस्रोच्या नियंत्रण कक्षाला सिग्नल मिळाला नसल्याची शक्यता स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी व्यक्त केली आहे. तसेच आगामी काळात लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
तब्बल 47 दिवसाच्या प्रवासानंतर शुक्रवार रात्री चांद्रयान -2 आपल्या अंतिम टप्प्यात दाखल होत असताना काही तांत्रिक कारणास्तव त्याचा संपर्क तुटला. यावेळी ते चंद्रच्या भूपृष्ठापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर होते.