महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bhujbal on anna Hazare : 'वाईन दुकानात मिळणार तर काही लोक उपोषणाला बसणार'

महाराष्ट्रात वाईन दुकानात मिळायला लागले तर लोक लगेच रस्त्यावर उतरू लागले आहे असा टोला भुजबळ यांनी भाजपवर ( Bhujbal on anna Hazare) टीका केली आहे. लासलगावमध्ये बोलताना भुजबळांनी अण्णा हजारे ( Bhujbal on anna Hazare ) यांचे नाव न घेता त्यांना टोला लागवला आहे.

By

Published : Feb 11, 2022, 8:04 PM IST

Bhujbal on Anna Hazare
Bhujbal on Anna Hazare

येवला (नाशिक) :-वाईन दुकानात मिळणार असल्यास काही लोक उपोषणाला (Anna Hazare Hunger Strike) बसणार असल्याचा इशारा दिला आहे. भुजबळांनी अण्णा हजारे ( Bhujbal on anna Hazare ) यांचे नाव न घेता त्यांना टोला लागवला आहे. शुक्रवारी लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याआधी राज्य सरकारने दुकानात वाईन विक्री केल्यास (Selling Wine in Supermarket) आमरण उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले होते.

व्हीडीयो

महाराष्ट्रात एक लाख लोकांमागे दारू विकण्याच्या दीड दुकान आहे. तर एक लाख लोकांच्या मागे कर्नाटकमध्ये पाच दारु विक्रीची दुकान तर मध्यप्रदेशमध्ये सात दुकान आहे. भाजपशासित प्रदेशामध्ये वाईन दुकानात मिळते. मात्र, महाराष्ट्रात वाईन दुकानात मिळायला लागले तर लोक लगेच रस्त्यावर उतरू लागले आहे असा टोला भुजबळ यांनी भाजपला लगावला.

अण्णांचे आमरण उपोषण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून राज्यात सुपरमार्केट, मोठ्या किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी देण्याच्या धोरणावर निर्णय मागे न घेतल्यास येत्या सोमवार 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथे राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आणि ओपन वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा. यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे स्मरणपत्र पाठवले आहे. अण्णांनी या विषयी एक पत्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले होते. त्या पत्राला उत्तर न मिळाल्याने त्यांनी पहिले आणि आज दुसरे असे चार पत्र पाठवले आहेत. मात्र, राज्य सरकारकडून अजून अण्णांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

काय आहे राज्य सरकारचा वाईन विक्रीविषयी निर्णय

राज्य सरकारने आता सुपर मार्केट ( Wine At Supermarkets ) वॉक इन स्टोअरमध्ये ( Wine in General Stores ) वाईन विक्रीला परवानगी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन किराणा दुकांनांमध्ये विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असा दावा केल्यानंतर याला वाईन उद्योजकांनीही पाठिंबा दिला आहे. विरोधकांनी मात्र हा शेतकऱ्यांचा नावावर काही लोकांना फायदा देण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा -Wine Selling Issue : अण्णा हजारें सोमवार पासून करणार शेवटचे बेमुदत उपोषण

ABOUT THE AUTHOR

...view details