महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक : पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आवर्तनाचे नियोजन करावे- पालकमंत्री - Chagan Bhujbal over water rotation in Nashik

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, ज्या कालव्यांच्या लाभ क्षेत्रात पाण्याच्या आवर्तनाची (रोटेशन) तत्काळ आवश्यकता आहे, अशा ठिकाणी पहिले आवर्तन द्यायला हरकत नाही.

पालकमंत्री छगन भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ

By

Published : Dec 11, 2020, 6:39 PM IST

नाशिक - यंदा जिल्ह्यातील कालव्यांमध्ये मुबलक पाणीसाठी उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून शेतकऱ्यांच्या गरजा व मागणी विचारात घेवून पाणी आवर्तनांचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिल्या आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, ज्या कालव्यांच्या लाभ क्षेत्रात पाण्याच्या आवर्तनाची (रोटेशन) तत्काळ आवश्यकता आहे, अशा ठिकाणी पहिले आवर्तन द्यायला हरकत नाही. तसेच ज्या ठिकाणी मागणी नाही, अशा धरणांच्या लाभ क्षेत्रात पाण्याचे आवर्तन तुर्तास थांबवावे. त्याचा उन्हाळ्यासाठी विचार करण्यात यावा.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पाणी वाटपाचा निर्णय घ्यावा-

रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी मिळेल याबाबत प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे. त्याचबरोबर लाभ क्षेत्राबाबत खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व पाणी वाटप संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी चर्चा करूनच वेळोवेळी निर्णय घेण्यात यावेत, असेही भुजबळ यांनी बैठकीत सांगितले आहे.

बैठकीत पाणीसाठा व भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा-

बैठकीत गंगापूर प्रकल्पातील डावा व उजवा कालवा, उर्ध्व गोदावरी प्रकल्पातील पालखेड, ओझरखेड प्रकल्प, चणकापूर प्रकल्पातंर्गत गिरणा कालवा, कडवा प्रकल्प यामधील उपलब्ध पाणीसाठा व त्याच्या भविष्यातील नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधी, पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी यांनी पाणी वाटपाबाबत असलेल्या समस्यांवर पालकमंत्री भुजबळ यांच्यासोबत चर्चा केली.

आकस्मिक मागणीच्या नियोजनाची ऑक्टोबरमध्ये केली होती सूचना

यंदा सर्वत्र ठिकाणी पाऊस चांगला झाला असल्याने पाण्याची अडचण कुठल्याही भागात भासणार नाही, तसेच सर्वच लाभक्षेत्रात देखील पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचीही चिंता नाही. पण, पाण्याचे वाटप सुरळीत होण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजबद्ध आरक्षण करून त्याचबरोबर आकस्मिक मागणीचेही नियोजन करावे, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑक्टोबरमध्ये केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details