नाशिक- प्रदूषणाच्या विळख्यातून काही क्षण का होईना बाहेर पडून शुद्ध हवेसह ऑक्सिजन मिळणे हे वर्दळीच्या भागात अगदी अशक्य वाटते. परंतु, नाशिक रोड रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्लरमुळे हे शक्य झाले आहे. या ऑक्सिजन पार्लरमधील झाडे तुम्ही घरातील कमी जागेतही ठेऊ शकतात.
काय सांगता... नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 'ऑक्सिजन' मिळणार विकत?
मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी काही ना काही नवीन कल्पना राबवत असते. आता तर चक्क रेल्वे स्थानकात ऑक्सिजन देणारे रोपटे विकण्याची योजना मध्य रेल्वेने सुरू केली आहे. यासाठी एका कंपनीला कंत्राट सुद्धा देण्यात आले आहे.
मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी काही ना काही नवीन कल्पना राबवत असते. आता तर चक्क रेल्वे स्थानकात ऑक्सिजन देणारे रोपटे विकण्याची योजना मध्य रेल्वेने सुरू केली आहे. यासाठी एका कंपनीला कंत्राट सुद्धा देण्यात आले आहे. यात नासाकडून मान्यता मिळालेल्या १८ प्रकारच्या रोपांची विक्री करण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून करण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक ७५ हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी 'झाडे वाढवा, पर्यावरण वाचावा' ही मोहीम देशभरात सुरू आहे. मध्य रेल्वेकडून सुद्धा पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वपूर्ण योजना आखण्यात आली आहे. हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर (रोपवाटिका) सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या रोपवाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा – NASA) कडून मान्यता प्राप्त १८ प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारी रोपे विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातावरण प्रवाशांना मिळेल. इतकेच नव्हे तर या रोपवाटिकेतून प्रवाशांना रोपटे विकत सुद्धा घेता येणार आहे. रोपट्यांची किंमत १२५ ते १२०० रुपयांपर्यत असल्याची माहिती मॅनेजर सुमित अमृतकर यांनी दिली आहे.