महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Fake Medical Certificate Case: नाशिक बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी 21 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Nashik Fake Medical Certificate Case

नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातून आंतरबदलीसाठी (Nashik district hospital inter transfer) बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र (Nashik bogus medical certificate case) घेणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांना विरोधात पोलीस दलाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा (case filed against 21 police personnel) दाखल करण्यात आला.

Nashik Fake Medical Certificate Case
Nashik Fake Medical Certificate Case

By

Published : Sep 22, 2022, 12:43 PM IST

नाशिक : येथील जिल्हा रुग्णालयातून आंतरबदलीसाठी (Nashik district hospital inter transfer) बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र (Nashik bogus medical certificate case) घेणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांना विरोधात पोलीस दलाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा (case filed against 21 police personnel) दाखल करण्यात आला. तसेच या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणारे संशयित अतिरिक्त सत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे आणि डॉ. किशोर श्रीवास फरार (Nashik extra session district surgeon absconding) झाले असून पोलीस पथके त्यांच्या मागावर आहे. (Nashik Latest Crime News)


मनाप्रमाणे बदली मिळविण्यासाठी बोगस प्रमाणपत्रांचा आधार -पोलीस दलामध्ये सोयीच्या ठिकाणी आंतर जिल्हा बदलीसाठी कुटुंबीयांना गंभीर आजाराची कारणे दाखवले जातात,आणि याचाच फायदा घेत नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचं समोर आलं आहे,अतिरिक्त शल्यचिकित्सक ते रुग्णालयातील लिफ्टमॅन अशा या रॅकेटचा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आता यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांची वाढ झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


दोन वैद्यकीय अधिकारी फरार :याप्रकरणी तालुका पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या पथकाकडून आता पर्यंत पोलीस दलाच्या लिपिक हिरा कनोज, जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमॅन कांतीलाल गांगुर्डे,लिपिक किशोर पगारे,डॉ निखिल सौंदणे,डॉ किशोर श्रीवास,खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापक वीरेंद्र यादव वैद्यकीय अधिकारी धुळे यांची नाव तपासात निष्पन्न झाली आहेत.यातील तीन जण जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून संशयित अतिरिक्त सत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निखिल सैंदाणे, डॉ किशोर श्रीवास यांच्या जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या मार्गावर पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितले...


'या' पोलिसांची प्रमाणपत्रे बनावट :आंतरजिल्हा बदली साठी 21 कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केली होती, त्यांच्या प्रमाणपत्राच्या पडताळणी ते बनावट असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे तालुका पोलिसांनी अशा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत यात निलेश झगडे,राजू झाडे,मोहन उगले, बाळू सदगीर,नितीन सांगळे, अनिकेत हळदे,निलेश पाटील, राहुल क्षत्रिय ,धनश्री देवरे, पवन अहिरे, सचिन विसपुते, अतुल चव्हाण, अमोल बच्छाव,शकील शेख, सोनू दिंडे, किशोर दाते,दिपाली सानप, पूजा गायधनी, सुजाता गावकर,योगेश शिंदे, निकिता ठोंबरे याचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details