महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिमुरड्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पित्यासह सावत्र आईविरोधात गुन्हा दाखल - nashik police news

पोलीस कर्मचारी राहुल मोरे या निर्दयी बापाने आपल्या लहान मुलांना किरकोळ कारनावरून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या मुलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

nashik
nashik

By

Published : Jan 17, 2021, 3:30 PM IST

Updated : Jan 17, 2021, 5:05 PM IST

नाशिक - नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात रेल्वे पोलीस खात्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी राहुल मोरे या निर्दयी बापाने आपल्या लहान मुलांना किरकोळ कारणारून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राहुल मोरे रेल्वे विभागात कामाला

रेल्वे पोलीस कर्मचारी राहुल मोरे या निर्दयी वडिलांनी आपल्या लहान मुलांना किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. लाथा-बुक्या, पट्टी, चपलेने गरम स्टोवर हात ठेवत या चिमुरड्यांना चटके देत अक्षरशः अंग लाल करून टाकले आहे. मोरे पोलीस खात्यात काम करतो. त्याचे दुसरे लग्न झाले असून पहिल्या पत्नीपासून हिमांशू आणि प्रियांशू ही दोन मुले आहेत. यांच्या आईचे दुर्धर आजारामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र त्यांची ही दुसरी पत्नीही या लहान मुलांना मारहाण करत असल्याचे मुलानी सांगितले आहे.

इगतपुरी पोलिसांत पित्याविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला दिनांक 15 जानेवारी रोज इगतपुरी पोलिसांचा फोन आला. पोलिसांनी विचारले हिमांशू मोरे आणि प्रियांशू मोरे हे कोण आहेत तर आम्ही सांगितले हे आमचे भाचे आहेत. तर पोलिसांनी मुलांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याचे आम्हाला सांगत तातडीने इगतपुरी येथे येण्यास सांगितले. त्यावरून आम्ही इगतपुरी येथे आलो असता मुलांना हाताला चटके व पाठीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचे आम्हाला दिसून आले. यावरून आम्ही इगतपुरी पोलिसांत मुलाच्या वडील आणि सावत्र आईविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या मुलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Last Updated : Jan 17, 2021, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details