नाशिक -बसला आग लागल्याची एक घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच एक धक्कादायक नाशिक जिल्ह्यातील वणी गडावर घडली आहे. वणी गडावर ( Bus Fire Vani Fort ) चालत्या बसने पेट घेतला आहे. नांदूरहून वणी गडावर बस जात असताना ही घटना घडली आहे. मात्र, सुदैवानं या घटनेत बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. स्थानिक रहिवासी, प्रशासनाने बसची आग विझवली. यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. 33 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये ३३ प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे. बसला आग लागताच प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. नाशिक शहरात आजच्या दिवसात बसमध्ये अग्नीतांडव झाल्याची ही दुसरी ( Bus going to Vani in Nashik catches fire ) घटना आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी नाशिकमध्ये खाजगी प्रवाशी बस आगीत होरपळलेल्या ( private passenger bus caught fire ) रुग्णांची रुग्णायात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. पोलिसांनी बचाव कार्य हाती घेतले आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पहाटे हा अपघात झाला. लक्झरी बस यवतमाळहून नाशिककडे जात होती. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.