नाशिक -मालेगाव येथील नवीन बस स्थानकावर उभ्या असलेल्या सटाणा आगाराच्या एसटी बसने अचानक पेट घेतला. सोमवारी (१३ मे) मध्यरात्री अचानक ही आग लागल्याने सर्वत्र धावपळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मालेगाव बस स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसला आग, जीवित हानी नाही - nashik
सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सटाणा आगाराची मुक्कामी बस (एच एच ०७ सी १९६३) उभी असताना तिला अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीमुळे शेजारी उभ्या असलेल्या वैजापूर आगाराची मुक्कामी बसदेखील जळाली.
मालेगाव बस स्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसला अचानक आग
सोमवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान सटाणा आगाराची मुक्कामी बस उभी असताना तिला अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीने रद्र रूप धारण केले. या आगीमुळे शेजारी उभ्या असलेल्या वैजापूर आगाराची मुक्कामी बस देखील जळाली.
नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. बसमध्ये प्रवासी आणि वाहन चालक नसल्याने जीवित हानी टळली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.