महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक - nashik car burning

शहरातील इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसीडेंसी मध्ये कुलवींदर कौर या महिला आपल्या कुटुंबासमवेत राहतात. मात्र, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या पार्किंगमध्ये दुचाकी चार्जीगला लावली होती. चार्जिंग सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दुचाकीचा भीषण स्फोट झाला.

इलेक्ट्रिक दुचाकी
इलेक्ट्रिक दुचाकी

By

Published : Jul 14, 2021, 11:32 AM IST

नाशिक - नाशिकच्या इंदिरानगर परीसरातील ऐश्वर्या रेसिडेन्सी या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग सुरू असतानाच भीषण स्फोट झाला आहे.या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी दुचाकी आणि 6 वीज मीटर पूर्णपणे जुळून खाक झाली आहेत.

इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक.

दुचाकी पूर्णपणे जळून खाक

शहरातील इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसीडेंसी मध्ये कुलवींदर कौर या महिला आपल्या कुटुंबासमवेत राहतात. पेट्रोल डिझेलचे वाढते दर बघता त्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी घेतली होती. मात्र, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या पार्किंगमध्ये दुचाकी चार्जीगला लावली होती. चार्जिंग सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दुचाकीचा भीषण स्फोट झाला. या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. तर बिल्डिंगमधील 6 वीज मीटरही आगीत जळून खाक झाले. सुदैवाने, अपार्टमेंट मधील 6 कुटुंबाचे प्राण वाचले आहेत. कालपासून बिल्डिंगची वीज ही गायब झाली आहे. मात्र हा स्फोट कसा झाला, अतिरिक्त चार्जिंग झाली की, काही शॉर्ट सर्किट झाले याबाबत तपास सुरू आहे.

बॅटरी ओव्हरहीट झाल्यामुळेही स्फोट
इलेक्ट्रिक दुचाकी किंवा इलेक्ट्रिक वाहन यांना आरटीओकडून तपासणी झाल्यानंतरच त्यांना बाजारात विक्रीस परवानगी दिली जाते. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, ओव्हर चार्जिंग किंवा चार्जर हे उंदराने कुरतडले तर शॉर्टसर्किट होऊन स्फोट होऊ शकतो. तसेच चार्जर त्याच कंपनीचे न वापरता दुसऱ्या कंपनीचे वापरल्यामुळे किंवा वाहनातील बॅटरी ओव्हरहीटमुळेही स्फोट होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांमध्ये घबराट
त्यामुळे या घटनेने इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या नागरिकांमध्ये जी भीती निर्माण झाली आहे. त्याबद्दल समजून घेणे गरजेचे आहे.आपल्या चुकीमुळेच असे प्रकार घडतात.आपण चार्ज करताना व्यवस्थित लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -नानांच्या बोलण्यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही - शिवसेना

ABOUT THE AUTHOR

...view details