नाशिक -येवल्यातील शेतकरी रामचंद्र भगत यांच्या मुलांनी दीपावली पाडव्या निमित्त सायंकाळी आपल्या रेड्याला सजवून शहरातून ढोलताशा-हलगीच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी रेड्याच्या शरीरावर त्यांनी जनजागृतीचे संदेश रेखाटले होते.
येवल्यात दिपावली पाडवानिमित्त रेड्याची मिरवणूक हेही वाचा... साहेब तुम्हीच सांगा जगायचं कसं? लोकप्रतिनिधी समोर शेतकरी ढसाढसा रडला!
या शेतकऱ्यांनी रेड्यावर 'वारसाच्या लालसाने स्त्री भ्रृणहत्या बळी .. आई बापच नाही का खरे खुनी... स्त्री भ्रृणहत्या थांबवा' असे संदेश रेखाटले होते. या भगत बंधू महेंद्र भगत, भोला भगत व योगेश भगत यांनी आपल्या रेड्यावर हे संदेश रेखाटून नागरिकांना स्त्री भ्रृणहत्या करू नका, असा संदेश देत त्याची शहरातून मिरवणूक काढली. या पाच वर्षीय रेड्याचे वजन 1600 किलो आहे. या शेतकऱ्याने रेड्याचे नाव रावण असे ठेवले आहे. येवल्यात दीपावली पाडव्याला सायंकाळी रेड्याची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.
हेही वाचा... दिंडोरीच्या खासदार आणि नांदगावच्या आमदारांचा नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा