महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Boyfriend physically abuses girlfriend's daughter: धक्कादायक, प्रियेसीच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराचा अनैसर्गिक अत्याचार - बलात्काराची लेटेस्ट बातमी

तक्रारदार महिलेचे दीड वर्षापासून शिवाजी साळवेसोबत प्रेमसंबंध आहेत. दोघे एकत्र राहत असताना त्याची नजर 11 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवरती होती. शिवाजी हा प्रियेसी कामावर गेल्यानंतर पीडित बालिकेसोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. त्याने या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले होते.

physically abuses
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 21, 2022, 1:20 PM IST

नाशिक -प्रियेसीच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराने अनैसर्गिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना मुंबईनाका परिसरात उघडकीस आली आहे. शिवाजी साळवे असे त्या नराधमाचे नाव आहे. शिवाजीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. दीड वर्षापासून शिवाजी साळवेसोबत तिचे प्रेमसंबंध आहेत. दोघे एकत्र राहत असताना त्याची नजर 11 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवरती होती. शिवाजी हा प्रियेसी कामावर गेल्यानंतर पीडित बालिकेसोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. त्याने या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले होते. दमदाटी करत शिवाजीने मुलीच्या लहान भावाला हे असे कृत्य करण्यास भाग पाडत त्याचेही चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. मुलीला त्रास झाल्यानंतर हा प्रकार आईच्या लक्षात आला. यानंतर आईने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण गंभीर असल्याने संशयिताचा माग काढत त्याला अटक केली आहे.

प्रियकरासोबत लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत होती महिला - परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ही 28 वर्षीय विवाहित महिला मूळ रहिवासी आहे. तिला पहिल्या पतीपासून अकरा वर्षाची मुलगी असून पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिने दुसऱ्या पुरुषासोबत विवाह केला. त्याच्यापासून तिला दोन मुले झाली. दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक कलह वाढू लागल्याने तिने विभक्त राहत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दीड वर्षापासून महिला विभक्त राहत आहे. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ती दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह- इन- रिलेशनमध्ये नाशिक येथे राहू लागली. आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी तिने धुणीभांडीची कामे सुरू केली. जेव्हा महिला कामावर जात असे, तेव्हा तिचा प्रियकर तिच्या अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता.

नराधमावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल - नाशिकच्या बजरंगवाडी भागात राहणाऱ्या महिलेने आमच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यात ती, तिचा प्रियकर शिवाजीच्या सोबत लिव्ह इन रिलेशशिपमध्ये राहत होती. या महिलेला अधीच्या पती पासून 11 वर्षाची मुलगी आहे. ही महिला जेव्हा कामानिमित्त घराबाहेर जात होती, तेव्हा शिवाजी हा 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. हा प्रकार काही महिन्यांपासून सुरू होता. जेव्हा मुलीने ही बाब आईला सांगितली, तेव्हा त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून काही तासात संशयिताला अटक केली असून त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ( पॉक्सो ) गुन्हा दाखल केला आहे. नराधमाला न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील लोहकरे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details