नाशिक- क्रिकेट खेळताना चक्कर येऊन एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सिडकाे येथे घडली आहे. या प्रकरणी अंबड पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. श्रेयस सुधीर ढोरे (रा. कालिका पार्क, अण्णा पाटील शाळेमागे, सिडको), असे त्या मुलाचे नाव आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सीसीटीव्ही : क्रिकेट खेळतताना चक्कर येऊन मुलाचा मृत्यू - क्रिकेट
क्रिकेट खेळताना चक्कर येऊन एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सिडकाे येथे घडली आहे. या प्रकरणी अंबड पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. श्रेयस सुधीर ढोरे (रा. कालिका पार्क, अण्णा पाटील शाळेमागे, सिडको), असे त्या मुलाचे नाव आहे.
श्रेयस हा त्याच्या मित्रांसह सिडको परिसरातील उंटवाडीतील रणभूमी मैदानावर रविवारी (दि. 11) क्रिकेट खेळत होता. त्यावेळी अचानक तो चक्कर आल्याने कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला बेशुद्धावस्थेत तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट हाेऊ शकले नाही. याबाबत पंकज जाधव यांनी अंबड पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वालदार बाेबले करत आहेत.
हेही वाचा -'तुला पप्पांनी बोलावले' म्हणून अल्पवयीन मुलीला बळजबरीने नेले लॉजवर; नराधमाने केले 'असे' दुष्कृत्य