नाशिक इगतपुरी तालुक्यातील उभाडेवाडी येथील कातकरी वस्तीवरील आदिवासी मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारी आणि बालमजुरी करण्यासाठी पाठविले जात आहे. तसेच या बालकांचा शारिरीक छळ होत असल्याची, गंभीर बाब येथील बालिका गौरी आगीवले हिच्या मृत्यूनंतर उघडकीस झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याबाबत शिवसेना नेत्या निलम गोरे, यांच्याबरोबर चित्रा वाघ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे श्रमजीवीचे विवेक पंडित यांनी भेट दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. यातील वेठबिगारी करणाऱ्या बालकांची शोध मोहीम राबविल्यानंतर आज तब्बल अकरा बालकांची वेठबिगारीतुन मुक्तता करण्यात आली. यात पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सहा तर संगमनेर हद्दीतून पाच बालकांचा समावेश आहे.
अल्पवयीन बालकांना आमिष दाखवत याबाबत वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील उभाडेवाडी येथील कातकरी वस्तीवरील बालकांना नगर आणि लगतच्या जिल्ह्यातील मेंढपाळ ( धनगर ) समाज अल्पमोबदल्यात अल्पवयीन बालकांना पालकांना दारू, आणि अल्प पैशाचे तसेच मेंढरूचे आमिष दाखवून मेंढ्या चारण्यासाठी आणि राखण्यासाठी घेऊन जात असतात. यातील गौरी आगीवले या बालिकेचा छळ करत तिला चटके देत, गळा आवळीत जखमी केल्यानंतर जखमी अवस्थेत या मुलीला पालकांच्या दारात टाकून संशयित धनगरांने पलायन केले होते. या मुलीला श्रमजीवी संघटनेचे संजय शिंदे ,सुनील वाघ यांच्या पुढाकाराने घोटी ग्रामीण रुग्णालयासह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सातच दिवसात या मुलीचा मृत्यू झाला होता.