नाशिक - मंत्री विजय वड्डेटीवार यांनी साधूंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत वड्डेटीवार यांच्यासह सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जर साधु समाजाची माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात सर्व समाज हा सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे.
'वडेट्टीवारांनी साधूंची माफी मागावी, अन्यथा ठाकरे सरकारविरोधात शंखनाद' - भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जर साधु समाजाची माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात सर्व समाज हा सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी दिला आहे.
सरकारचा हिंदूविरोधी अजेंडा -
मंत्री विजय वड्डेटीवार यांनी साधूंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसलेंनी सरकारवर चांगलीच तोफ डागली. भोसले म्हणाले की, साधूंचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे मनोरुग्ण मंत्री आहेत. या सरकारचा हिंदूविरोधी अजेंडा आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्याख्येत हे बसते का? या सरकारमधील मंत्री महिलांचा अपमान करत आहेत. रावणाच्या मंत्रीमंडळाला लाजवेल असे स्वैराचारी सध्याचे मंत्रीमंडळ आहे. त्यामुुळे जर माफी मागितली नाही तर उद्या नाशिकच्या रामकुंडावर सर्व साधू-संत शंखनाद करून आंदोलन करणार असल्याची माहिती तुषार भोसले यानी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी -
हिंदू धर्माविषयी अतिशय आदराचे स्थान असणाऱ्या साधू महंतांच्या विषयी असे अपशब्द वापरणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, सध्याचे राज्यातील सरकार हे जाणूनबुजून हिंदू धर्माविषयी अपशब्ध काढत आहेत. आणि त्यातून हिंदु धर्माचा अवमान होत असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे साधू महंत घंटानाद आणि शंखनाद करणार आहेत. सोमवारी सकाळपर्यंत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
TAGGED:
मंत्री विजय वडेट्टीवार