नाशिक- शिवसेनेने श्वान घेऊन आंदोलन केल्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना अटक करावी, या मागणीसाठी शहराध्यक्ष गिरिश पालवे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यावेळी शिवसेनेला सत्तेचा माज आला असून तो उतरावा लागेल, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी -
भाजपा नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांच्यावर खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी नाशिक मधील भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर जरमन शेफड श्वानांच्या गळ्यात नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या नावाच्या पाट्या टाकून आंदोलन केले होते. दरम्यान या आंदोलनावेळी युवासेनेच्या आंदोलकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत या आंदोलकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भद्रकाली पोलिसांना निवेदन देण्यात आले. तसेच जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच आंदोलकांनी परवानगी घेऊन हे आंदोलन केले का? असा सवाल उपस्थित केला आहे.
आंदोलनात प्राण्यांचा वापर करणे हा गुन्हा -