नाशिक -शहरातील हनुमानवाडी येथे गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांचे संवाद संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जे. पी. नड्डा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत राहणार होते. मात्र, जवळपास अडीच तास नड्डा उशिरा दाखल झाले. त्यामुळे त्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर लोक उठून जाऊ लागले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या संख्येने लोकांनी सभागृह सोडले. एकूणच हा प्रकार पाहून नड्डा यांनीही आपले भाषणही आटोपते घेतले.
रिकाम्या खुर्च्या आणि पदाधिकाऱ्यांची धावपळ
जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची वेळ दुपारी १ वाजताची होती. मात्र कार्यक्रम स्थळी नड्डा जवळपास अडीच तास उशीरा दाखल झाले होते. यानंतर लोक उठून जात असताना नड्डा यांनी नाशिक शहराध्यक्षांना लोक उठून जात असल्याचे खुनवले देखील होते. भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी हे लोकांनी जाऊ नये यासाठी प्रयत्न केले, मात्र लोक थांबले नाहीत. अखेर हा प्रकार घडल्याने नड्डा यांनीही आपले भाषणही आटोपते घेतले.