महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारदार शस्त्राने वार करून भाजपा मंडळ अध्यक्षाची हत्या - नाशिक क्राइम न्यूज

शहरातील सातपूर परिसरात भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे (Amol Ighe) यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सर्वसाधारण आठच्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून अवघ्या चार दिवसांमध्ये तीन हत्या झाल्या आहेत.

अमोल इघे
अमोल इघे

By

Published : Nov 26, 2021, 2:52 PM IST

Updated : Nov 26, 2021, 2:59 PM IST

नाशिक - शहर हत्येच्या घटनेने हादरले असून मागील चार दिवसातील ही तिसरी हत्या आहे. शहरातील सातपूर परिसरात भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे (Amol Ighe) यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून अवघ्या चार दिवसांमध्ये तीन हत्या झाल्या आहेत.

उपचार सुरू असताना मृत्यू

याबाबत पोलिसांकडून उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी, की सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे (Amol Ighe) हे आज सकाळी कामगार युनियनच्या कामाकरता सातपूर एमआयडीसी(MIDC)मध्ये गेले होते. त्यावेळी तेथे अंतर्गत वाद झाले आणि त्या वादातून धारदार शस्त्राने अमोल यांच्यावर वार करण्यात आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सर्वसाधारण आठच्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

चार दिवसांमधील तिसरी घटना

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने विभाग दोनचे पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे मागील चार दिवसांमध्ये शहरांमध्ये हा त्याची ही तिसरी घटना घडली आहे यामुळे खळबळ उडाली आहे.

Last Updated : Nov 26, 2021, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details