नाशिक -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह नारायण राणे यांची प्रतिमा मलिन करण्याच्या कारणावरून सामना वृत्तपत्राच्या संपादकांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार भाजपा पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
भाजपाकडून मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नवा घेत नाही. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राणे यांच्या विरोधात शिवसेनेने गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी देखील तत्परता दाखवत राणे यांना अटक करून कोर्टात हजर केले होते. या प्रकरणात राणे यांना रात्री कोर्टातून जामीन मिळाला होता. मात्र दिवसभर या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेत संघर्ष बघायला मिळाला होता.
'मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा'
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर भाजपा सक्रिय झाले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वरून सरदेसाई तसेच सामनाच्या संपादक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या तक्रार अर्ज वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. एका ध्वनीचित्रफितीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकेरी उल्लेख करत 'हा कसला योगी, हा तर भोगी' कारण योगी असेल तर मुख्यमंत्री कसा होऊ शकतो. त्याने कुठेतरी गुहेत जाऊन बसायला पाहिजे, असे विधान केल्याचे भाजपा कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या निंदनीय वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे, अशी मागणी भाजपाने केली आहे. तसेच दुसऱ्या तक्रार अर्जात दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या सामना दैनिकात संपादकीय शिर्षकाखाली भोक पडलेला फुगा, या मथळ्याखाली छापण्यात आलेल्या मजकुरात भारत सरकारचे सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांच्याबद्दल बेताल आणि त्यांची प्रतिमा मलिन करतील असे वक्तव्य करण्यात आले आहे. या अग्रलेखात राणे यांना विविध अत्यंत अशोभनीय व अब्रू नुकसानकारक शब्दाचा वापर करून चिखलफेक करण्यात आली आहे. एका घटनात्मक पदावर विराजमान मंत्री नारायण राणे हे नामधारी मंत्री असून अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणाऱ्या सामनाच्या संपादकांवर गुन्हा दाखल करावा, असेही भाजपा कार्यकर्त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याअनुशगांने गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा-अतुल भातखळकर